गुरु सियाग सिद्धयोगामध्ये कुंडलिनी जागरण शक्तिपात दीक्षेद्वारा होते. समर्थ गुरु द्वारा शक्तिपात दीक्षेचे चार प्रकार आहेत-स्पर्शाने, दृष्टीने, मंत्राद्वारे आणि ( संकल्प) दृढ धारणा. गुरु सियाग सिद्धयोगामध्ये शक्तिपात दीक्षा दिव्य मंत्राद्वारे होते. हा दिव्य मंत्र फक्त गुरुदेव सियाग यांच्या आवाजातच ( ऑडिओ / विडिओ क्लिप द्वारे) ऐकला जातो.
शक्तिपात चा अर्थ आहे ऊर्जेचे संचारण ( ट्रान्सफर). शक्तिपात मध्ये समर्थ गुरु दिव्य मंत्राने साधकाची कुंडलिनी जागृत करतात. त्या कुंडलिनीला वरपर्यंत घेऊन जाण्याची साधना, गुरुदेवांनी सांगितलेल्या मार्गाने साधकाला स्वतः करायची असते. गुरु सियाग सिद्धयोग नाथपंथी योगीयांची देणगी आहे, ज्याला शक्तिपात म्हटले जाते. बऱ्याचदा साधक असे समजतात कि, शक्तिपात मध्ये गुरूंची ऊर्जा साधकाच्या शरीरात ट्रान्सफर होते किंवा गुरु साधकाच्या शरीरात काही सोडतात. परंतु या विषयी गुरु सियाग सिद्धयोगाचे म्हणणे काही वेगळे आहे : सर्व वैदिक ज्ञान तसेच शास्त्रांच्या अनुसार कुंडलिनी शक्ती प्रत्येक मानवामध्ये सुषुप्त अवस्थेमध्ये आहे. तेव्हा शक्तीचे ट्रान्सफर एका व्यक्तीकडून दुसऱ्या मध्ये शक्य नाही.
सोप्या भाषेत शक्तिपात म्हणजे एका पेटत्या (प्रकाशित) दिव्याने दुसरा न पेटलेला (अप्रकाशित) दिवा प्रकाशित करणे. प्रत्येक मानव जन्मत: पूर्ण आहे, तुम्ही असा दिवा आहात ज्यामध्ये तेल आणि वात दोन्ही आहेत, फक्त प्रकाश नाही आहे. तुम्हाला फक्त दुसऱ्या पेटत्या (प्रकाशित ) दिव्याची आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही त्या प्रकाशित दिव्याच्या संपर्कात याल तुम्ही सुद्धा प्रकाशित (परिवर्तित) व्हाल. हाच गुरु सियाग सिद्धयोगाचा शक्तिपात आहे.