(mr) Guru Siyag Yoga

ध्यान व नाम जपामुळे  साधकाची कुंडलिनी जागृत होऊ लागते. ही शक्ती प्रत्येक मानवाच्या शरीरातील पाठीच्या कण्याच्या ( मेरुदंड) शेवटच्या टोकाला सुषुप्त अवस्थेमध्ये असते.  तसेच सुषुम्नामध्ये अदृश्य रूपात उपस्थित ६ चक्रांना जोडलेली असते. जेव्हा जो कोणी व्यक्ती, समर्थ गुरु जसे की, गुरुदेव सियाग यांच्याद्वारे शक्तिपात दीक्षा प्राप्त करतो आणि गुरुदेवांनी सांगितलेली साधना करतो, तेव्हा त्याची कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला सुरुवात होते. जेव्हा ही कुंडलिनी शक्ती ६ चक्रांचे भेदन  करत डोक्याच्या वरच्या भागामध्ये स्थित सहस्रारापर्यंत पोहचते, तेव्हा असे मानले जाते की साधक पूर्णत्वाला पोहचला.  साधकाला ध्यानामध्ये त्याच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार योगिक क्रिया जसे आसन, क्रिया, बांध, मुद्रा, प्राणायाम इत्यादी सुद्धा होऊ शकतात. या क्रिया साधकाला शारीरिक, मानसिक समस्यांपासून, व्यसनांपासून सहज मुक्त करतात. काही साधकांना विविध प्रकारच्या अनुभूती होतात ज्या साधकाला अध्यात्मिक  विकासाच्या मार्गावर पुढे नेतात.

error: Content is protected !!