(mr) Guru Siyag Yoga

गुरु सियाग सिद्धयोग साधनेमध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो.

१) मंत्र जप
२) ध्यान

१) मंत्र जप:

या साधनेमध्ये गुरुदेवांद्वारे दिला जाणारा मंत्र हा संजीवनी मंत्र आहे. हा मंत्र गुरु सियाग यांच्या आवाजातच (व्हिडिओ / ऑडिओमध्ये) ऐकायचा आहे. समर्थ सद्गुरू देव श्री रामलालजी सियाग यांच्या आवाजात संजीवनी मंत्र ऐकणे ही, या साधनेतील “मंत्रदीक्षा”आहे.

या मंत्राचा मानसिक जप जीभ वा होठ न हलविता करायचा आहे. हा मंत्र दुसरा कोणाला सांगायचा असल्यास फक्त आणि फक्त गुरुदेवांच्या आवाजातच ऐकवायचा आहे. या मंत्राचा ध्यानाच्या वेळी तसेच दिवसभर जास्तीत जास्त मानसिक जप करायचा आहे. गुरुदेव सांगतात की, निरंतर मंत्रजप ही या साधनेची गुरुकिल्ली आहे.

२) ध्‍यान:
या साधनेमध्ये ध्यानाची अगदी सोपी पद्धत आहे.
गुरु सियाग सिद्धयोग साधनेमध्ये समर्थ सद्गुरुदेव श्री रामलालजी सियाग यांच्या ‘दिव्य फोटोचे’ ध्यान केले जाते. ध्यान दिवसातून दोन वेळा सकाळी आणि सायंकाळी पंधरा- पधरा मिनिटे केले जाते. बाकी वेळेत जास्तीत- जास्त नामजप करायचा आहे.
गुरु सियाग योगामध्ये ध्यान आणि  मंत्राचा मानसिक जप केला जातो. या योग पद्धतीमध्ये  शक्तिपात दीक्षेने गुरुदेवांद्वारे दिला जाणारा मंत्र हा संजीवनी मंत्र आहे. या संजीवनी मंत्राच्या जपाने कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची प्रक्रिया सुरु होते. प्राचीन काळामध्ये गुरु संपूर्ण आयुष्यभर जप करून तो मंत्र आपल्या सर्वोत्तम शिष्याला देत होते . पुन्हा त्या शिष्याद्वारे ( पुढचा गुरु ) तो मंत्र आणखी पुढे दिला जात होता. अशाप्रकारे  मंत्रामध्ये अनेक गुरूंच्या साधनेची शक्ती भरलेली आहे. या युगामध्ये हा मंत्र प्रत्येक मानवापर्यंत पोचवणे आवश्यक झाले आहे.

ध्यान कसे करायचे (ध्यानाची प्रक्रिया ) आणि संजीवन मंत्र  ( गुरु सियाग यांच्या आवाजात ऑडिओ /विडिओ क्लिप) www.gurusiyagyoga.org/mr/  या वेबसाईट वर उपलब्ध आहे.  ध्यान दिवसातून दोन वेळा १५-१५ मिनिटे सकाळी आणि सायंकाळी केले जाते. बाकी दिवसभर मंत्राचा जास्तीत-जास्त जप करायचा आहे.  मंत्राचा निरंतर जप केल्याने काही काळानंतर मंत्र अजपा जपामध्ये परिवर्तीत होतो.  हे साधकाच्या ध्यान व नाम जपाच्या समर्पणावर  आवलंबून आहे.  गुरु सियाग सिद्धयोग पूर्णपणे निशुल्क ( फ्री) आहे.

error: Content is protected !!