(mr) Guru Siyag Yoga

आधुनिक  वैद्यकीय  विज्ञानानुसार  (Modern Medical Science) मानवी शरिरात मुख्यतः दोन प्रकारचे रोग होतात – मानसिक आणि शारीरिक.  ज्यावर डॉक्टर आतून , बाहेरून औषधे देऊन, थेरपी द्वारे उपचार करतात. प्राचीन काळातील योगियांनी ध्यानाच्या अनुभवाच्या आधारावर सांगितले आहे कि,  मानवाच्या शरीरातील रोग हे त्याच्या वर्तमान व भूतकाळातील कर्मांच्या आधारावर होतात.  व्यक्तीच्या प्रत्येक कर्माची प्रतिक्रिया (कर्मफळ ) असते,  ज्याचा परिणाम एकतर त्या जन्मात वा पुढच्या जन्मात होतो.  प्रत्येक मानव जीवन-मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला आहे, आणि त्याला कर्माच्या आधारावर जीवनाचे अनुभव होतात. हा प्रकृतीचा नियम आहे.  व्यक्ती जीवन-मरणाच्या या चक्रात फसतच राहतो.

गुरु सियाग सिद्धयोगाच्या साधनेने साधक कर्मबंधनापासून मुक्त होऊ लागतो आणि समर्थ गुरुची विधी असल्याने कष्ट सहजपणे काटले जातात.  तसेच साधनेमुळे पुढे वाईट कर्मे होत नाहीत. आत्मसाक्षात्कार झाल्याने साधक कर्म फळाच्या इच्छेपासून सहजपणे मुक्त होऊ लागतो.  पतंजली योगसूत्रामध्ये शारीरिक (Physical ) तसेच मानसिक (Mental)  च्या व्यतिरिक्त आध्यात्मिक (Spiritual)  रोग सुद्धा सांगितले आहेत. आध्यात्मिक रोगांना आध्यात्मिक उपचाराची आवश्यकता असते. नियमित ध्यान तसेच मानसिक जप केल्याने साधकाचे आध्यात्मिक रोग सुद्धा बरे होतात.

error: Content is protected !!