(mr) Guru Siyag Yoga

मी मांस खातो, दारू पितो, मला जर तंबाखू, सिगरेट, बिडी यासारखे व्यसन असेल तर ध्यानासाठी काही बंधने आहेत काय?

ध्यान सुरू करण्याआधी या गोष्टी मला सोडाव्‍या लागतील काय?

व्यसन सोडल्यानंतरच मी ध्यान करू शकतो काय?

* नाही! तुम्हाला काहीही सोडायचे नाही!!

* मातृशक्ती (कुंडलिनी शक्ती) जी “गुरु सियाग सिद्ध योगामध्ये” फोटो ध्यान व संजीवनी मंत्र जपाने जागृत होते, तिला चांगल्या प्रकारे माहीत असते की, आपल्या शरीराला काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही.कोणत्याही प्रयत्ना शिवाय (केवळ इच्छा केल्‍यास) तुम्हाला अशा गोष्टींपासून दूर करते, की ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी हानीकारक आहेत.

* थोडक्यात, वस्तू तुम्हाला सोडायच्‍या नाहीत, तर वस्तूच तुम्हाला सोडून जातील.

* जितक्या जास्त समर्पण भावाने नियमितपणे ध्यान आणि जास्तीत-जास्त नामजप कराल, तितक्या लवकर व्यसने आपोआप सुटून जातील.

* कसलीही काळजी न करता तुम्ही काहीही खाऊ-पिऊ शकता. फक्त तुम्ही मनापासून ध्यान आणि नामजप करत राहा.

* गुरुदेव सांगतात की, “नाम आणि नशा एक साथ राहणारच नाहीत. ईश्वरीय शक्ती कोणत्याही प्रकारचं बंधन लावत नाही. या ध्यानामध्ये शक्ती असेल तर वाईट गोष्टी आपोआप तुम्हाला सोडून जातील.”

* हे अशाप्रकारे समजलं जाऊ शकते की जसं, सूर्य, हवा, पाणी, ढग, फुले इत्यादी नैसर्गिक गोष्टी कधीही कोणत्याही प्रकारचे बंधन लावत नाहीत. तुम्ही मटन खाल्लं, तुम्ही दारू पीत असाल, तुम्ही चांगल्या वाईट गोष्टी केल्या तरीसुद्धा सूर्य, हवा, पाणी, ढग, फुले इत्यादी तुम्हाला कोणत्याही गोष्टी पासून वंचित ठेवत नाहीत, मग ईश्वरीय शक्ती तुमच्यावर बंधन का लावेल?
यामुळेच गुरुदेव तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन लावत नाहीत.

* महिला महिन्याच्या तीसही दिवस हे ध्यान करू शकतात.

error: Content is protected !!