(mr) Guru Siyag Yoga

प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन प्रकारच्या वृत्ती असतात : सात्विक (शुद्ध,  शांत, तेजस्वी ), राजसिक,  ( आवेशपूर्ण, तीव्र, क्रोधशील), तामसिक ( निष्क्रियता, नकारात्मकता, अज्ञानता, आळस) , ह्या तीन वृत्ती कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व निर्धारित करतात. वृतींच्या आधारावरच व्यक्तीचे जीवन, त्याची कर्मे, आवडी-निवडी इत्यादी असतात.  व्यक्तीचे  खान- पान सुद्धा त्याच्या वृत्ती वर आधारित असते. जसे कि, तामसी वृत्ती हावी झाल्याने व्यक्ती व्यसनांच्या  अधीन होतो.  ध्यान आणि नामजपाने मनुष्याच्या वृत्तीमध्ये परिवर्तन येते.  निरंतर नाम जपाने व्यक्तीला नामाची अशी नशा चढू लागते की, त्याला वस्तूचं व्यसन करण्याची आवश्यकता समाप्त होते. ज्यामुळे अखाद्य वस्तू आणि व्यसनं आपोआप सुटली जातात. व्यसने तुम्ही नाही तुमच्या आतल्या तामसी वृत्ती मागतात.  या ध्यानाने तामसीक वृत्ती, सात्विक  वृत्तीनंमध्ये परिवर्तित होऊन जातात तसेच निरिच्छित

वा शरीराला अनुपयोगी/ हानीकारक गोष्टी आपोआप सोडल्या जातात.

यासंबंधात स्वामी विवेकानंद जी यांनी  अमेरिकेमध्ये सांगितलं होतं की, “वस्तू तुम्हाला सोडायच्या नाहीत, तर वस्तूच तुम्हाला सोडून जातील. ” सर्व प्रकारची व्यसने जसे दारू, अफीम, हिरोइन, बिडी, सिगारेट, गुटका, जर्दा इत्यादींपासून विना समस्या सुटका मिळते. कोणत्याही अन्नपदार्थावर  मजबूरी सारखी निर्भरता आपोआप  दूर होते, तसेच कोणतेही दुष्परिणाम  (साईड इफेक्ट)  होत नाहीत. जसं लठ्ठपणा कोणालाही आवडत नाही,  परंतु खाण्याची लालसा  (खरे पाहता  शरीराची मागणी ) सुटत नाही.  हे ध्यान आणि नामजप वजन कमी करण्यास मदत करू लागेल. खाणे-पिणे आपल्या नियंत्रणात येऊ लागेल.  असे कोणतेही व्यसन जे आपण सोडू इच्छिता,  ते या ध्यान आणि नाम जपाने स्वतःच  सुटून जाईल.

आज संपूर्ण विश्व भयंकर तणावाने व्यापलं आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये मनोरुग्णांची संख्या सर्वाधिक आहे,विशेषतः पश्चिमी देशांमध्ये! भौतिक विज्ञानाजवळ मानसिक तणाव शांत करण्याचा कोणताही प्रभावी उपाय नाही.भौतिक शास्त्रज्ञ मानवी मेंदूला औषधांच्या मदतीने शांत करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहेत. औषधांचा प्रभाव(नशा) उतरता तणाव पुन्हा पहिल्या सारखाच राहतो. तसेच त्या संबंधित रोग आधीसारखेच जसेच्या-तसे राहतात. वैदिक मनोविज्ञान अर्थात गुरु सियाग सिद्धयोग मानसिक तणाव शांत करण्याची क्रियात्मक पद्धत (विधी) सांगतो. भौतिक विज्ञानाप्रमाणेच भारतीय योगदर्शन सुद्धा “व्यसनांना” पूर्ण उपचार मानते. परंतु ते “व्यसन ईश्वराच्या नामाचं” असलं पाहिजे, कोणत्याही भौतिक पदार्थाचे नाही.

error: Content is protected !!