(mr) Guru Siyag Yoga

कोणा दुसऱ्या व्यक्तीसाठी ध्यान केले जाऊ शकते काय?

काही विशेष परिस्थितीमध्ये असं केलं जाऊ शकतं. जेव्हा संबंधित व्यक्ती काही विशेष कारणांमुळे ध्यान करू शकत नाही, तेव्हा दुसऱ्यासाठी ध्यान केले जाऊ शकते.

  1. अगदी लहान मुलांसाठी त्यांचे आई-वडील ध्यान करू शकतात. पाच वर्षांपेक्षा मोठी मुले थोड्या-थोड्या वेळासाठी ध्यानाला बसू शकतात. पाच वर्षापेक्षा लहान मुलांसाठी त्यांचे आई-वडील ध्यान करू शकतात.
  2. अपंग व्यक्ती वा मानसिक रोगी जे स्वतः ध्यान करू शकत नसतील, त्यांच्यासाठी त्या व्यक्तीच्या कुटुंबातील जवळची वा त्या व्यक्तीच्‍या समस्या निवारण्यासाठी आंतरिक तळमळ वाटणारी व्यक्ती त्या रोगी व्यक्तीचा बरोबर बसून व त्याच्यासाठी ध्यान करू शकते.
  3. ज्या व्यक्ती कोमात आहेत वा ज्यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे वा जी व्यक्ती औषध उपचार करूनही विचार करण्याच्या स्थितीमध्ये नसेल, अशा व्यक्तींसाठी सुद्धा ध्यान केले जाऊ शकते.
error: Content is protected !!