आरामदायक स्थितीमध्ये बसा, आपण कुठेही कोणत्याही स्थितीमध्ये बसू शकता. मांडी घालून फरशीवर, कुशनवर, योगा मॅटवर, कारपेट वा जमिनीवर बसू शकता. जर मांडी घालून बसू शकत नसाल तर खुर्चीवर, सोफ्यावर बसू शकता. जे आजारी आहेत वा बसू शकत नसतील, ते झोपून ध्यान करू शकतात. शरीर ढिले सोडून बसा, शरीराला ओढून-ताणून बसू नका. जर शरीराला अधिक ताण देऊन बसाल तर आपलं लक्ष/ मेंदू शरीराच्या थकणाऱ्या भागाकडे कडे जाईल. आरामदायक स्थितीमध्ये बसल्याने मन शरीराकडे कडे जाणार नाही.
- आपले डोळे बंद ठेवा आणि गुरुदेवांना ध्यानामध्ये मदत करण्यासाठी प्रार्थना करा. बहुतांश साधक अलार्म न लावताही जवळपास पंधरा मिनिटानंतर ध्यानामधून बाहेर येतात. अलार्म अगदी कमी आवाजामध्ये लावा कि, ज्यामुळे अलार्म वाजल्याने तुम्ही ध्यानामधून सहजपणे बाहेर येऊ शकाल.
- गुरूदेवांचा फोटो इतक्या वेळेपर्यंत पहा कि, गुरूदेवांचा फोटो आपल्या लक्षात राहील. त्यानंतर डोळे बंद करा आणि मनातल्या मनात गुरुदेवांना प्रार्थना करा – “हे गुरुदेव ! पंधरा मिनिटे ध्यानामध्ये मदत करा”. त्यानंतर डोळे बंद असताना गुरूदेवांचा फोटो भुवयांच्या मधोमध (तिसरा डोळा) जिथे आपण टिळा -टिकली लावतो त्या ठिकाणी पहा. अर्थातच आपल्याला गुरूदेवांचा फोटो कपाळावर पाहायचा आहे. उदाहरण म्हणून, समजा, तुम्ही तुमचा मित्र वा कोणत्याही प्रिय व्यक्तीचा फोटो मनामध्ये विचार करा. लगेचच तो चेहरा आपल्या मनामध्ये येतो. हा चेहरा कपाळाच्या भागामध्ये कुठेही येतो, अशा प्रकारे गुरूदेवांचा फोटोचा विचार करा.
- गुरूदेवांचा फोटो कल्पना करत मनातल्या मनात पंधरा मिनिटे गुरुदेवांनी दिलेल्या संजीवनी मंत्राचा जप करत रहा. कसलाही आवाज न करता मनातल्या मनामध्ये जीभ वा होठ न हलविता मानसिक जप करा. संजीवनी मंत्राचा स्पष्ट आणि योग्य उच्चार मध्यम गतीने मनात करा. अगदी हळू गतीने जप कराल तर मन इतरत्र भटकण्याची शक्यता राहील. तसेच अधिक गतीने जप केल्यास शब्दांचा उच्चार चुकीचा होऊ शकतो. अशाप्रकारे पंधरा मिनिटानंतर आपण आपोआप ध्यानामधून बाहेर याल.
- ध्यानामध्ये आपणास काही शरीराचे योगिक अनुभव येऊ शकतात वा हालचाली ( मुव्हमेंट्स ) होऊ शकतात . जसे की, मागे झुकणे, डोक्याचे मागे-पुढे हलणे, उजवीकडे-डावीकडे हलणे, प्राणायाम होणे, टाळी वाजवणे, तोंडातून आवाज काढणे, मुद्रा इत्यादी असा काहीही अनुभव येऊ शकतो. असे शरीराच्या आवश्यकतेनुसार आपोआप होते. साधकाने अशा गोष्टी स्व- ईच्छेने करण्याचा वा थांबवण्याचा प्रयत्न करू नये.
- काही लोकांना थरथर (कंपन), होते, प्रकाश, रंग दिसतात. हे अध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्याचे संकेत आहेत. जर आपणास वरीलपैकी काहीही अनुभव येत नसतील तर, असे समजू नये की, आपली प्रगती नाही होत आहे. असं असू शकतो की, आपल्या विकासासाठी त्या अनुभवाची आवश्यकता नसावी.
- हे ध्यान दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी पंधरा- पंधरा मिनिटे करायचे आहे. बाकी वेळेत जास्तीत- जास्त नामजप करायचा आहे. बहुतांश साधक साधारणपणे पंधरा मिनिटानंतर आपोआप ध्यानातून बाहेर येतात. सुरुवातीला पंधरा मिनिटांचा अलार्म लावू शकता.