सर्व प्रकारचे राग परिस्थितीला नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांमुळे येतात, आणि जेव्हा परिस्थिती वा घटना आपल्या इच्छेनुसार घडत नाहीत तेव्हा आपल्या आत मध्ये निराशा आणि राग उत्पन्न करतात. आपण आपली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी इतके आतुर होतो की, ती इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपली स्वतःमधील ऊर्जा अग्नि बनून जाते, ती आपल्याला जाळते. (रागामध्ये घेऊन जाते). गुरुदेव सियाग म्हणतात कि, मृत्यूनंतर शरीर अग्नीमध्ये जाळलं जातं त्याला अग्नी राखेमध्ये बदलवितो, परंतु राग व्यक्तीला जिवंतपणी जाळतो. रागामध्ये आपण आपला विवेक हरवून बसतो. तसेच रागामध्ये ते सर्व काही करतो वा बोलून बसतो, ज्याला ठीक केला जाऊ शकत नाही, ज्याच्यामुळे कधीकधी कायमचं नुकसान होते. या कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या रागामुळे जीवनामध्ये चुकीचा निर्णयांची साखळी सुरू होते.
थेंरेपिस्ट आणि डॉक्टर रागावर नियंत्रण करण्याचे अनेक प्रकारचे उपाय सांगतात जसे कि, राग नियंत्रित करण्याचा बाहेरून प्रयत्न करणे, राग दाबणे वा त्याला अन्य कोणत्याही उपयोगी कार्यामध्ये वळविण्याचा प्रयत्न वा श्वासोच्छवासाच्या व्यायामाद्वारे राग दाबण्याचे प्रयत्न. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये राग त्वरित शांत करण्यासाठी झोपेच्या गोळ्या देणे वा मेंदू नियंत्रित करण्याची औषधे देणे इत्यादी. परंतु हे सारे उपाय काही मर्यादेपर्यंतच तसेच अगदी कमी कालावधीसाठी मदत करतात. परंतु रागाची समस्या मात्र समाप्त होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे उपाय काही प्रमाणात त्या रागाला बाहेर पसरविण्याच्या ऐवजी आत मध्ये वळवितात आणि राग कायमस्वरूपी समाप्त होत नाही. गुरुदेव सांगतात की, अशा प्रकारे रागाची कधीही न संपणारी साखळी तयार होते. तुम्ही तुमचा राग इतर दुसऱ्या कोणावरही काढता आणि ती व्यक्ती ही शांतपणे तो राग ग्रहण करत नाही. त्या व्यक्तीचा राग इतर कोणत्याही रूपात आपल्यावर वा कोणावरही निघेल. अशाप्रकारे राग शांत होण्याचा कोणताही अंत नाही. हे असे आहे की, एखाद्यावर चिखल उडवाल तर बदल्यात चिखलच मिळणार आहे. पिढ्यान-पिढ्या असेच चालत आले आहे आणि तो राग आता घृणेत बदलला आहे. कोणीही या घृणाचक्राला तोडू शकत नाही आहे. तर मग या राग आणि घृणा चक्राला कसे तोडायचे ? यासाठी गुरुदेव सांगतात की, या रागाला पूर्णपणे समाप्त करण्यासाठी वा विरघळवण्यासाठी ध्यानाच्या सागराची आवश्यकता आहे. क्रोधाचे कारण कोणा दुसऱ्या व्यक्तीमध्ये न शोधता साधकाने क्रोधाचे जागृतपणे निरीक्षण केले पाहिजे. मग व्यक्तीला समजेल की, राग एक प्रकारचा आवेग आहे, त्याची मुळे कोणा दुसऱ्या व्यक्ती वा घटनेमध्ये नाहीत.
ध्यानामध्ये तुम्ही कोणावरही रागावत नाही. फक्त तुम्ही रागात असता. तुम्हाला जाणवेल कि, राग ही एक अशी ऊर्जा आहे की, जी बाहेरील आहे तसेच तुम्ही तिला आत प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. जेव्हा ही ऊर्जा आत प्रवेश करते तेव्हा ती एक विशेष रूप घेते .हा राग एकतर कोणाकडे तरी वळतो (डायवर्ट ) वा स्वतःला व्दिधापूर्ण स्थितीमध्ये टाकतो. ध्यानामध्ये त्या रागाची काही विशेषतः उरत नाही. जेव्हा- जेव्हा राग जाणवेल साधकाने त्याला ध्यानामध्ये विसर्जित केले पाहिजे. अशा प्रकारे जो राग तुमच्याकडे आला होता तो राग ब्रह्मांडामध्ये फेकला जातो. जसी एखादी नदी समुद्राला मिळते तेव्हा आपले स्वरूप विसरून समुद्र बनून जाते. अशाप्रकारे जेव्हा राग ध्यानामध्ये मोकळा (रिलीज) केला जातो, तेव्हा तेव्हा तो ब्रह्मांडामध्ये विलीन होतो. मात्र हे एकदा केलेल्या प्रयत्नाने होणार नाही आहे. साधकाने राग येताच जाणीवपूर्वक ही विधी अवलंबली पाहिजे. हळूहळू राग पूर्णपणे निघून जाईल. जर राग आल्याने ध्यान करणे शक्य नसेल तर मंत्राचा निरंतर जप केला पाहिजे.
गुरुदेव सांगतात की, तुम्हाला जेव्हा रागाच्या पहिल्या तरंगाची जाणीव होईल, लगेचच मंत्रजप सुरू करा. मंत्राचे तरंग रागाचा तरंगाच्या व्यर्थतेची जाणीव करून देतील. रागाचे ते तरंग तुमच्या आत शिरकाव करण्याऐवजी जवळून दूर जातील. तुम्ही रागाच्या त्यात तरंगापासून अप्रभावित राहाल.