सामान्यपणे असे समजले जाते की, ध्यान (मेडिटेशन) करण्यासाठी लक्ष केंद्रित करावं लागतं, यामुळे हे मुलांसाठी नाही आहे. मात्र हे खरं नाही. बहुतांश मुले शांतपणे पंधरा मिनिटे बसू शकत नाहीत, परंतु केवळ पाच मिनिटांसाठी ध्यान निश्चितपणे करू शकतात. जेव्हा मुले शांत वेळेचा आनंद घेतील त्यानंतर हळूहळू वेळ आपोआपच वाढत जाईल. बालपण हा असा काळ असतो की, या काळात मुलांवर कोणतीही जबाबदारी नसते. मुलांनी आपलं बालपण आनंदात जगलं पाहिजे, सामान्यपणे मोठ्यांचे असे विचार असतात. परंतु हे आंशिक सत्य आहे. निश्चितपणे मुलांना इतकी समज नसते की, ते स्वतः केलेल्या कृतींचे वा भविष्यात काय परिणाम होतील, हे समजू शकतील. मुलांना त्यांच्या स्वतःच्या समस्या असतात जसे की, अभ्यासाची चिंता, शाळेचीची चिंता, मोठ्यांच्याप्रती त्यांचे वागणे, सामाजिक वातावरण तसेच आशा , शारीरिक चिंता (रंग-रूपाची) इत्यादी. अशाप्रकाचे तणाव मुलांचे वागणे, खाण्या पिण्याच्या सवयी, शारीरिक वाढ विकास, शरीर स्वास्थ्य, शाळेमधील अभ्यास व वागणे तसेच इतर मुलांशी होणारी देवाण-घेवाण इत्यादींना नकारात्मक रित्या प्रभावित करतात.
गुरु सियाग सिद्धयोग या प्रकारच्या तणावामुळे होणाऱ्या नकारात्मक प्रवाहापासून मुलांना दूर ठेवतो. मुलांमध्ये लपलेल्या कला-गुणांना, क्षमता व प्रतिभांना फुलवितो. गुरु सियाग सिद्धयोग अगदी सहजपणे मुलांच्या शाळा आणि दैनंदिन कार्यामध्ये सामील केला जाऊ शकतो.
मुलांमधील तणावापासून मुक्ती
आपण नेहमी असा विचार करतो की, ध्यान म्हणजे विचारशून्य होण्याचा प्रयत्न करणे, परंतु असे नाही आहे. ध्यान अशांत मनाला शांत करण्याची प्रक्रिया (विधी) आहे. उदाहरणार्थ पाण्याने भरलेल्या ग्लासात माती टाकून तो हलविला असता, पूर्ण ग्लासामध्ये माती तरंगताना दिसते. नंतर हळूहळू माती ग्लासाच्या तळाला बसून जाते. यानंतर ग्लासामध्ये स्वच्छ पाणी दिसू लागते. जरी की माती अजूनही क्लास मध्ये आहे. अगदी याच प्रकारे आपण ध्यान करतो तेव्हा विचारांचं वादळ काही वेळेपर्यंत मनामध्ये फिरत राहते. नंतर जस-जसे मुलांचे मंत्र जपावर लक्ष केंद्रित होऊ होत जाते, तस-तसे विचार शांत होऊ लागतात आणि मन शांत होऊ लागते. जेव्हा मन शांत होते तेव्हा याचा प्रभाव पूर्ण शरीरावर पडतो. आणि तणाव त्वरित कमी होतो वा निघून जातो.
अभ्यासात चांगली प्रगती
अशाप्रकारे मुलांमधील कमी झालेला ताण त्यांची जागरूकता वाढवितो आणि लक्ष केंद्रित करतो. जे विद्यार्थी गुरु सियाग सिद्धयोगाचे नियमित अभ्यास करत होते त्यांचा असा अनुभव आहे की, त्यांना अवघड विषय सुद्धा सोपे वाटू लागले आहेत. एकाग्रता वाढल्याने स्मरणशक्ती सुद्धा वाढली आहे आणि लवकर लक्षात राहू लागले आहे.
चिंता आणि नैराश्य कमी करणे
ठराविक काळानंतर आपण सतत ऐकत असतो की, काही मुले अभ्यासाच्या तणावामुळे नापास होण्याच्या भीतीमुळे वा अन्य दुसऱ्या कारणांमुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या करतात. जर शाळा व महाविद्यालये १५ मिनिटांचे ध्यान आपल्या अभ्यासक्रमात सामाविष्ट करतील तर या भयानक घटनांपासून मुलांना वाचविले जाऊ शकते. यासाठी कमीत- कमी आई-वडील तरी मुलांना घरी सकाळी आणि संध्याकाळी ध्यानासाठी बसवू शकतात. मुले जेवढ्या कमी वयात ध्यान सुरू करतील तितक्या लवकर प्रगती करतील. गुरु सियाग यांनी सांगितलेल्या पध्दतीने ध्यान करणाऱ्या मुलांनी सांगितले की, ते आता पहिल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तणाव व चिंता यांच्या पलीकडे जाण्यास सक्षम आहेत
परीक्षेच्या अगोदर ध्यान, अभ्यासाच्या अगोदर ध्यान मन आणि शरीराला शांत ठेवते आणि हातामध्ये घेतलेले कार्यमध्ये मन चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित होते. गुरु सियाग यांचे ध्यान भावनात्मक संतुलनालाही मजबूत बनविते. मुलं कोणत्याही दबावांच्या परिस्थितीत सुद्धा शांतपणे घटनाक्रमाचे अवलोकन करतात आणि भावनिक वा निराश न होता भविष्यासाठी चांगले निर्णय घेण्यास सक्षम होऊ लागतात.
मुलांमध्ये नवीन कल्पनांचा विचार करण्याच्या क्षमतांचा विकास
गुरु सियाग योगाने मुलांमध्ये मानसिक क्षमतांचा विकास झाल्याने मुलं रचनात्मक कल्पनांचा (क्रियेटीव्ह आयडिया) विचार करू लागतात. प्रत्येक कार्य अगदी वेगळ्याप्रकारे जलदपणे करण्याची क्षमता विकसित होऊ लागते. जो विकास आई-वडील मुलांना समजावून सांगून करू शकत नाहीत, तो गुरु सियाग यांच्या साधने आपोआप होऊ लागतो. आनंदपूर्ण मानसिक स्थिती
गुरु सियाग यांच्या ध्यानाची पद्धत मुलांच्या व्यक्तीमहत्वावर अत्यंत चांगला प्रभाव टाकते. मुले आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण दिसू लागतात. काही मुलांनी सांगितलं की, ध्यान सुरू केल्यापासून ते खूपच आशावादी झाले आहेत, त्यांचा प्रत्येक कार्यामध्ये आत्मविश्वास वाढला आहे.संकटांना घाबरणे बंद झाले आहे आणि नवीन गोष्टी आपोआप डोक्यामध्ये येऊ लागल्या आहेत. आनंदपूर्ण मानसिक स्थितीमुळे मुलांच्या भांडखोर सवयी तसेच हट्टीपणा सुद्धा कमी झाला आहे. ते आजूबाजूच्या लोकांबरोबर चांगल्या प्रकारे वागु लागले आहेत आणि याच्यामुळे त्यांचे सामाजिक कौशल्य तसेच सामाजिक संबंधात सुधारणा झाली आहे.
उच्च चेतनेचा विकास
मुलांमध्ये इतरांप्रती दया तसेच सहानुभूतीचा विकास, इतरांच्या गरजांप्रती जागरुक होणे इतरांप्रती योग्यप्रकारे वागणे. गरजूवंतांच्या प्रती दयेचा भाव उत्पन्न होणे तसेच अन्यायाच्या विरुद्ध उभे राहण्याच्या क्षमतेचा विकास होणे इत्यादी
प्रत्येक आई-वडील मुलांसाठी जगतात आणि आपल्या मुलांना यशाच्या उंच शिखरावर पाहू इच्छितात. आधीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांचा भावनात्मक विकास योग्य पद्धतीने होत होता. मुलं भावनात्मकरित्या योग्यप्रकारे विकसित होत होती. आजच्या काळात विभक्त कुटुंबातील मुले आणि आई-वडील दोन्हीही चिडचिडे राहतात. मुलांचा मानसिक विकास सुद्धा योग्य प्रकारे होत नाही आहे.परिस्थितीमुळे आई- वडील सुद्धा मुलांना योग्य वेळ देऊ शकत नाहीत. मुलांचे योग्य संगोपन होत नाही. अशामध्ये गुरु सियाग यांची ध्यान पध्दती (विधि) मुलांना त्यांच्या मार्गावरून भटकू देणार नाही. आई-वडील केवळ मुलांमध्ये गुरुदेव सियाग यांचे ध्यान करण्याचे संस्कार उतरवू शकले तरी मुलांची बाकी काळजी कुंडलिनी शक्ती आपोआप घेईल, आणि मुलांना त्या यशाच्या शिखरावर घेऊन जाईल जिथे आपण मुलांना पाहू इच्छितात.