ध्यान करताना कोण-कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
* या पद्धतीमध्ये गुरुदेवांच्या फोटोला आज्ञाचक्रावर पाहून दिलेला संजीवनी मंत्राचा जाप केल्याने साधकाची कुंडलिनी शक्ती चेतन होते, आणि साधकाच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार योगीक क्रिया, प्राणायाम इत्यादी करून घेते.
* शरीराला पूर्णपणे सैल सोडा. डोळे बंद ठेवा. फोटो लक्षात राहील वा ना राहील त्याची चिंता करू नका. मनामध्ये येणाऱ्या विचारांची चिंता न करता मानसिक जप निरंतर सुरू ठेवा.
* कंपन, मागे-पुढे झुकणे, झोपणे, पडणे, रडणे, हसणे, प्रकाश वा रंग दिसणे वा अन्य कोणत्याही क्रिया तसेच बंध,मुद्रा, प्राणायाम इत्यादी होऊ शकतात. या क्रियांमुळे घाबरायचं नाही आहे, तसेच याला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. अशा गोष्टी मातृशक्ती कुंडलिनी शारीरिक रोगांना बरे करण्यासाठी करून घेते.
* योगीक क्रिया व अनुभूती होत नाही म्हणून साधना बंद करू नका. रोज सकाळी-संध्याकाळी नियमितपणे ध्यान केल्याने काही दिवसातच अनुभूती येण्यास सुरुवात होईल.
* ध्यान करताना मंत्राचा मानसिक जप करा. तसेच जेव्हा ध्यान करत नसाल जसे की, जेवताना, उठताना, बसताना, आंघोळ करताना, लिहिता-वाचताना, कामावर येता-जाताना, गाडी चालवताना म्हणजेच ध्यानाच्या व्यतिरिक्त इतर वेळेत मंत्राचा जास्तीत- जास्त मानसिक जप करा.
* जेव्हा एकदा एखादा व्यक्ती गुरूदेव सियाग यांच्याशी जोडला जातो, तसेच जेव्हा एखाद्या व्यक्तीने मंत्र दीक्षा घेतली असेल व गुरुदेवांच्या फोटोने ध्यान केले असेल, तो व्यक्ती गुरूदेवांचा शिष्य बनून जातो. दोघेही सूक्ष्म स्तरावर गुरुदेवांची जोडले जातात. वेळ व अंतर काहीही असो त्या व्यक्तीचा आध्यात्मिक संबंध सूक्ष्म तसेच मजबूत बनून राहतो.
* ही दिव्य अनुभूती समर्थ सद्गुरूदेव सियाग यांच्याप्रती पूर्ण समर्पणानेच प्राप्त केली जाऊ शकते. पैशांनी, चतुराईने, कपटाने वा कोणत्याही दिखाव्याने नाही.